सुरा यासीन मराठी अनुवादासह
मराठी भाषांतरासह सुरा यासीनचे मानवी जीवनावर अनेक आध्यात्मिक आणि भावनिक परिणाम होतात. हा पवित्र कुराणाचा ३६ वा अध्याय आहे, जो कुराणच्या २२ व्या आणि २३ व्या परिच्छेदात आढळतो. सुरा यासीन शक्तिशाली मार्गदर्शन आणि ज्ञान देते. त्याचे भाषांतर वाचल्याने मुस्लिमांना त्याचा संदेश चांगल्या प्रकारे समजण्यास, ज्ञान वाढविण्यास आणि त्याच्या शिकवणी अधिक अर्थपूर्ण बनविण्यास मदत होते. ते नैतिक आणि नैतिक धडे देखील प्रदान करते जे दैनंदिन जीवनात स्पष्टता आणतात.
सुरा यासीनच्या ८३ श्लोकांमुळे मनःशांती मिळू शकते, विशेषतः तणावाच्या काळात. अरबी भाषेत त्याचे पठण केल्याने आध्यात्मिक बक्षीस मिळते, तर भाषांतराद्वारे संपूर्ण अर्थ समजून घेतल्याने अधिक खोलवरचा संबंध निर्माण होतो. सुरा यासीन ९५+ भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे जगभरातील लोक ते सहजपणे समजू शकतात. प्रत्येक मुस्लिमांना त्याचा संदेश पूर्णपणे समजून घेण्यासाठी किमान एकदा तरी संपूर्ण भाषांतर वाचण्यास प्रोत्साहित केले जाते. वाचकांसाठी सुरा यासीन ऑनलाइन पाठ करणे किंवा संपूर्ण सुरा यासीन मराठी पीडीएफ डाउनलोड करणे आणि जलद प्रवेशासाठी त्यांच्या डिव्हाइसवर जतन करणे सोपे आहे—इंटरनेट कनेक्शन नसतानाही.
सुरा यासीन मराठी ऑडिओ ऐका
मराठी अनुवादासह संपूर्ण सुरा यासीन ऑनलाइन वाचा
36.7
لَقَدۡ حَقَّ ٱلۡقَوۡلُ عَلَىٰٓ أَكۡثَرِهِمۡ فَهُمۡ لَا يُؤۡمِنُونَ
यांच्यापैकी बहुतेक लोक शिक्षेस पात्र ठरले आहेत, याच कारणास्तव ते श्रद्धा ठेवत नाहीत.ا
Tafseer
36.6
لِتُنذِرَ قَوۡمٗا مَّآ أُنذِرَ ءَابَآؤُهُمۡ فَهُمۡ غَٰفِلُونَ
जेणेकरून तुम्ही सावध करावे अशा जनसमुदायाला ज्याचे पूर्वज सावध केले गेले नव्हते व या कारणाने ते गाफील पडलेले आहेत.ا
Tafseer
36.9
وَجَعَلۡنَا مِنۢ بَيۡنِ أَيۡدِيهِمۡ سَدّٗا وَمِنۡ خَلۡفِهِمۡ سَدّٗا فَأَغۡشَيۡنَٰهُمۡ فَهُمۡ لَا يُبۡصِرُونَ
आम्ही एक भिंत त्यांच्यापुढे उभी केली आहे आणि एक भिंत त्यांच्यामागे, आम्ही त्यांना अच्छादले आहे, त्यांना आता काही सुचत नाही.ا
Tafseer
36.8
إِنَّا جَعَلۡنَا فِيٓ أَعۡنَٰقِهِمۡ أَغۡلَٰلٗا فَهِيَ إِلَى ٱلۡأَذۡقَانِ فَهُم مُّقۡمَحُونَ
आम्ही त्यांच्या मानेत जोखड घातले आहे ज्यामुळे ते हनुवटीपर्यंत जखडले गेले आहेत, म्हणून ते डोके वर करून उभे आहेत.ا
Tafseer
36.11
إِنَّمَا تُنذِرُ مَنِ ٱتَّبَعَ ٱلذِّكۡرَ وَخَشِيَ ٱلرَّحۡمَٰنَ بِٱلۡغَيۡبِۖ فَبَشِّرۡهُ بِمَغۡفِرَةٖ وَأَجۡرٖ كَرِيمٍ
तुम्ही तर त्याच माणसाला सावध करू शकता जो उपदेशाचे अनुसरण करील आणि न पाहता मेहरबान ईश्वराला भीत असेल त्याला क्षमा आणि सन्मान्य मोबदल्याची शुभवार्ता द्या.ا
Tafseer
36.10
وَسَوَآءٌ عَلَيۡهِمۡ ءَأَنذَرۡتَهُمۡ أَمۡ لَمۡ تُنذِرۡهُمۡ لَا يُؤۡمِنُونَ
यांच्याकरिता समान आहे तुम्ही यांना सावध करा अथवा करू नका हे मानणार नाहीत.ا
Tafseer
36.13
وَٱضۡرِبۡ لَهُم مَّثَلًا أَصۡحَٰبَ ٱلۡقَرۡيَةِ إِذۡ جَآءَهَا ٱلۡمُرۡسَلُونَ
यांना उदाहरणार्थ त्या वस्तीवाल्यांची कथा ऐकवा, जेव्हा त्यात प्रेषित आले होते.ا
Tafseer
36.12
إِنَّا نَحۡنُ نُحۡيِ ٱلۡمَوۡتَىٰ وَنَكۡتُبُ مَا قَدَّمُواْ وَءَاثَٰرَهُمۡۚ وَكُلَّ شَيۡءٍ أَحۡصَيۡنَٰهُ فِيٓ إِمَامٖ مُّبِينٖ
आम्ही निश्चितच एके दिवशी मृतांना जिवंत करणार आहोत. जी काही कृत्ये त्यांनी केलेली आहेत, ती सर्व आम्ही लिहित आहोत आणि जे काही अवशेष त्यांनी मागे सोडले आहेत तेसुद्धा आम्ही अंकित करीत आहोत. प्रत्येक गोष्ट आम्ही एका उघड ग्रंथात नोंद करून ठेवली आहे.ا
Tafseer
36.15
قَالُواْ مَآ أَنتُمۡ إِلَّا بَشَرٞ مِّثۡلُنَا وَمَآ أَنزَلَ ٱلرَّحۡمَٰنُ مِن شَيۡءٍ إِنۡ أَنتُمۡ إِلَّا تَكۡذِبُونَ
वस्तीवाल्यांनी सांगितले, तुम्ही काहीच नाही परंतु आमच्याचसारखी काही माणसे आणि परमकृपाळू ईश्वराने कोणतीच वस्तू मुळीच उतरविली नाही, तुम्ही निव्वळ खोटे बोलत आहात.ا
Tafseer
36.14
إِذۡ أَرۡسَلۡنَآ إِلَيۡهِمُ ٱثۡنَيۡنِ فَكَذَّبُوهُمَا فَعَزَّزۡنَا بِثَالِثٖ فَقَالُوٓاْ إِنَّآ إِلَيۡكُم مُّرۡسَلُونَ
आम्ही त्यांच्याकडे दोन प्रेषित पाठविले आणि त्यांनी दोघांना खोटे ठरविले. मग आम्ही तिसरा मदतीसाठी पाठविला आणि त्या सर्वांनी सांगितले, आम्ही तुमच्याकडे प्रेषित म्हणून पाठविले गेलो आहोत.ا
Tafseer
36.17
وَمَا عَلَيۡنَآ إِلَّا ٱلۡبَلَٰغُ ٱلۡمُبِينُ
आणि आमच्यावर स्पष्टपणे संदेश पोहचविण्याव्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी नाही.ا
Tafseer
36.16
قَالُواْ رَبُّنَا يَعۡلَمُ إِنَّآ إِلَيۡكُمۡ لَمُرۡسَلُونَ
प्रेषितांनी सांगितले, आमचा पालनकर्ता जाणतो की आम्ही निश्चितच तुमच्याकडे प्रेषित म्हणून पाठविले गेलो आहोत,ا
Tafseer
36.19
قَالُواْ طَـٰٓئِرُكُم مَّعَكُمۡ أَئِن ذُكِّرۡتُمۚ بَلۡ أَنتُمۡ قَوۡمٞ مُّسۡرِفُونَ
प्रेषितांनी उत्तर दिले, तुमचे अशुभ फलित तर तुमच्या स्वतःबरोबरच आहे. काय या गोष्टी तुम्ही यासाठी करीत आहात की तुम्हाला आदेश केला गेला? वस्तुतः गोष्ट अशी आहे की तुम्ही मर्यादेपलीकडे गेलेले लोक आहात.ا
Tafseer
36.18
قَالُوٓاْ إِنَّا تَطَيَّرۡنَا بِكُمۡۖ لَئِن لَّمۡ تَنتَهُواْ لَنَرۡجُمَنَّكُمۡ وَلَيَمَسَّنَّكُم مِّنَّا عَذَابٌ أَلِيمٞ
वस्तीवाले म्हणू लागले, आम्ही तर तुम्हाला आमच्यासाठी अपशकून मानीत आहोत. जर तुम्ही परावृत्त झाला नाही तर आम्ही तुम्हाला दगडांनी मारून टाकू आणि आमच्याकडून तुम्ही भयंकर यातनादायक शिक्षा भोगाल.ا
Tafseer
36.21
ٱتَّبِعُواْ مَن لَّا يَسۡـَٔلُكُمۡ أَجۡرٗا وَهُم مُّهۡتَدُونَ
अनुकरण करा त्या लोकांचे जे तुमच्याकडून कोणताही मोबदला इच्छित नाहीत आणि योग्य मार्गावर आहेतا
Tafseer
36.20
وَجَآءَ مِنۡ أَقۡصَا ٱلۡمَدِينَةِ رَجُلٞ يَسۡعَىٰ قَالَ يَٰقَوۡمِ ٱتَّبِعُواْ ٱلۡمُرۡسَلِينَ
इतक्यात शहरातील दूरवरच्या कोपर्याहून एक मनुष्य धावत आला आणि म्हणाला, हे माझ्या देशबांधवांनो, प्रेषितांचे अनुकरण करा.ا
Tafseer
36.23
أَأَتَّخِذُ مِنْ دُونِهِ آلِهَةً إِنْ يُرِدْنِ الرَّحْمَٰنُ بِضُرٍّ لَا تُغْنِ عَنِّي شَفَاعَتُهُمْ شَيْئًا وَلَا يُنْقِذُونِ
काय मी त्याला सोडून दुसर्यांना उपास्य बनवावे? वास्तविकतः जर परमकृपाळू ईश्वराने मला काही हानी पोहचवू इच्छिली तर त्यांची शिफारसही माझ्या काही उपयोगी पडणार नाही किंवा ते मला सोडवूदेखील शकणार नाहीत.ا
Tafseer
36.22
وَمَا لِيَ لَآ أَعۡبُدُ ٱلَّذِي فَطَرَنِي وَإِلَيۡهِ تُرۡجَعُونَ
मी त्या अस्तित्वाची भक्ती का करू नये ज्याने मला निर्माण केले आणि ज्याकडे तुम्हा सर्वांना रुजू व्हायचे आहे?ا
Tafseer
36.27
بِمَا غَفَرَ لِي رَبِّي وَجَعَلَنِي مِنَ الْمُكْرَمِينَ
की माझ्या पालनकर्त्याने कोणत्या कारणास्तव मला क्षमादान केले आणि मला प्रतिष्ठित लोकांत सामील केले.ا
Tafseer
36.26
قِيلَ ادْخُلِ الْجَنَّةَ ۖ قَالَ يَا لَيْتَ قَوْمِي يَعْلَمُونَ
(सरतेशेवटी त्या लोकांनी त्याला ठार मारले आणि) त्या माणसाला सांगितले गेले की प्रवेश कर स्वर्गामध्ये. त्याने सांगितले, माझ्या जातीबांधवांना हे माहीत झाले असते!ا
Tafseer
36.29
إِنْ كَانَتْ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً فَإِذَا هُمْ خَامِدُونَ
केवळ एक विस्फोट झाला आणि अकस्मात ते सर्व विझले.ا
Tafseer
36.28
وَمَا أَنْزَلْنَا عَلَىٰ قَوْمِهِ مِنْ بَعْدِهِ مِنْ جُنْدٍ مِنَ السَّمَاءِ وَمَا كُنَّا مُنْزِلِينَ
त्यानंतर त्याच्या जातीबांधवांवर आम्ही आकाशांतून एखादे लष्कर उतरविले नाही. आम्हाला लष्कर पाठविण्याची काही गरज नव्हती.ا
Tafseer
36.31
أَلَمْ يَرَوْا كَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُمْ مِنَ الْقُرُونِ أَنَّهُمْ إِلَيْهِمْ لَا يَرْجِعُونَ
काय यांनी पाहिले नाही की यांच्यापूर्वी आम्ही कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही त्यांच्याकडे परतून आले नाहीत?ا
Tafseer
36.30
يَا حَسْرَةً عَلَى الْعِبَادِ ۚ مَا يَأْتِيهِمْ مِنْ رَسُولٍ إِلَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ
खेद आहे दासांच्या दशेवर जो कोणी प्रेषित त्याच्यापाशी आला त्याची ते थट्टाच करीत राहिले.ا
Tafseer
36.33
وَآيَةٌ لَهُمُ الْأَرْضُ الْمَيْتَةُ أَحْيَيْنَاهَا وَأَخْرَجْنَا مِنْهَا حَبًّا فَمِنْهُ يَأْكُلُونَ
या लोकांकरिता निर्जीव जमीन एक संकेत आहे. आम्ही तिला जीवन प्रदान केले आणि तिच्यापासून धान्य उत्पन्न केले जे हे खातातا
Tafseer
36.32
وَإِنْ كُلٌّ لَمَّا جَمِيعٌ لَدَيْنَا مُحْضَرُونَ
त्या सर्वांना एके दिवशी आमच्यासमोर हजर केले जाणार आहे.ا
Tafseer
36.35
لِيَأْكُلُوا مِنْ ثَمَرِهِ وَمَا عَمِلَتْهُ أَيْدِيهِمْ ۖ أَفَلَا يَشْكُرُونَ
जेणेकरून यांनी तिची फळे खावीत. हे सर्वकाही यांच्या स्वतःच्या हातांनी निर्माण केलेले नाही. तरीही काय हे कृतज्ञता दाखवत नाहीत?ا
Tafseer
36.34
وَجَعَلْنَا فِيهَا جَنَّاتٍ مِنْ نَخِيلٍ وَأَعْنَابٍ وَفَجَّرْنَا فِيهَا مِنَ الْعُيُونِ
आम्ही तिच्यात खजुरीच्या व द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि तिच्यातून झरे प्रवाहित केलेا
Tafseer
36.37
وَآيَةٌ لَهُمُ اللَّيْلُ نَسْلَخُ مِنْهُ النَّهَارَ فَإِذَا هُمْ مُظْلِمُونَ
यांच्याकरिता आणखीन एक संकेत रात्र आहे, आम्ही तिच्यावरून दिवस हटवितो तेव्हा यांच्यावर अंधकार पसरतो.ا
Tafseer
36.36
سُبْحَانَ الَّذِي خَلَقَ الْأَزْوَاجَ كُلَّهَا مِمَّا تُنْبِتُ الْأَرْضُ وَمِنْ أَنْفُسِهِمْ وَمِمَّا لَا يَعْلَمُونَ
पवित्र आहे ते अस्तित्व ज्याने सर्व प्रकारच्या जोड्या निर्माण केल्या, मग त्या जमिनीतील वनस्पतींपैकी असोत अथवा खुद्द यांच्या स्वजातीय (अर्थात मनुष्य) पैकी, अथवा त्या वस्तूंपैकी ज्यांची यांना माहितीदेखील नाही.ا
Tafseer
36.39
وَالْقَمَرَ قَدَّرْنَاهُ مَنَازِلَ حَتَّىٰ عَادَ كَالْعُرْجُونِ الْقَدِيمِ
आणि चंद्रासाठी आम्ही मजल ठरविल्या आहेत येथपावेतो की तो त्यातून वाटचाल करीत पुन्हा खजुरीच्या शुष्क फांदीसमान उरतो.ا
Tafseer
36.38
وَالشَّمْسُ تَجْرِي لِمُسْتَقَرٍّ لَهَا ۚ ذَٰلِكَ تَقْدِيرُ الْعَزِيزِ الْعَلِيمِ
आणि सूर्य, तो आपल्या ठराविक स्थानाकडे जात आहे. जबरदस्त सर्वज्ञ अस्तित्वाकडून सुनिश्चित केलेला हा हिशोब आहे.ا
Tafseer
36.41
وَآيَةٌ لَهُمْ أَنَّا حَمَلْنَا ذُرِّيَّتَهُمْ فِي الْفُلْكِ الْمَشْحُونِ
यांच्यासाठी हासुद्धा एक संदेश आहे की आम्ही यांच्या वंशजांना भरलेल्या नौकेत स्वार केले.ا
Tafseer
36.40
لَا الشَّمْسُ يَنْبَغِي لَهَا أَنْ تُدْرِكَ الْقَمَرَ وَلَا اللَّيْلُ سَابِقُ النَّهَارِ ۚ وَكُلٌّ فِي فَلَكٍ يَسْبَحُونَ
सूर्याच्या आवाक्यात हे नाही की त्याने जाऊन चंद्राला गाठावे आणि रात्रही दिवसावर मात करू शकत नाही. सर्व एका नभोमंडळात तरंगत आहेत.ا
Tafseer
36.43
وَإِنْ نَشَأْ نُغْرِقْهُمْ فَلَا صَرِيخَ لَهُمْ وَلَا هُمْ يُنْقَذُونَ
आम्ही इच्छिले तर यांना बुडवून टाकू, कोणीही यांची दाद घेणारा नसेल आणि कोणत्याही प्रकारे त्यांचा बचाव होणार नाही.ا
Tafseer
36.42
وَخَلَقْنَا لَهُمْ مِنْ مِثْلِهِ مَا يَرْكَبُونَ
आणि मग यांच्याकरिता तशाच प्रकारच्या नौका आणखीन निर्माण केल्या ज्यावर हे स्वार होत असतात.ا
Tafseer
36.45
وَإِذَا قِيلَ لَهُمُ اتَّقُوا مَا بَيْنَ أَيْدِيكُمْ وَمَا خَلْفَكُمْ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ
या लोकांना जेव्हा सांगण्यात येते की स्वतःला वाचवा त्या परिणामापासून जो तुमच्यापुढे येत आहे आणि तुमच्यापूर्वी ओढावला होता. कदाचित तुमच्यावर दया केली जाईल,ا
Tafseer
36.44
إِلَّا رَحْمَةً مِنَّا وَمَتَاعًا إِلَىٰ حِينٍ
आमची कृपाच आहे जी यांना तारते आणि एका विशिष्ट वेळेपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी बहाल करते.ا
Tafseer
36.47
وَإِذَا قِيلَ لَهُمْ أَنْفِقُوا مِمَّا رَزَقَكُمُ اللَّهُ قَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلَّذِينَ آمَنُوا أَنُطْعِمُ مَنْ لَوْ يَشَاءُ اللَّهُ أَطْعَمَهُ إِنْ أَنْتُمْ إِلَّا فِي ضَلَالٍ مُبِينٍ
आणि जेव्हा यांना सांगितले जाते की अल्लाहने जी उपजीविका तुम्हाला प्रदान केली आहे तिच्यापैकी काही अल्लाहच्या मार्गातसुद्धा खर्च करा, तर हे लोक ज्यांनी द्रोह केला आहे, श्रद्धा ठेवणार्यांना उत्तर देतात, आम्ही त्या लोकांना जेवू घालावे काय ज्यांना अल्लाहने इच्छिले असते तर स्वतः जेवू घातले असते? तुम्ही तर पूर्णपणे बहकलेले आहात.ا
Tafseer
36.46
وَمَا تَأْتِيهِمْ مِنْ آيَةٍ مِنْ آيَاتِ رَبِّهِمْ إِلَّا كَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ
(तर हे ऐकल्या न ऐकल्यासारखे करतात) यांच्यासमोर यांच्या पालनकर्त्याकडून संकेतामधून जो कोणता देखील संकेत येतो हे त्याकडे लक्ष देत नाहीत.ا
Tafseer
36.49
مَا يَنْظُرُونَ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً تَأْخُذُهُمْ وَهُمْ يَخِصِّمُونَ
वास्तविकतः हे ज्या गोष्टीची वाट पाहात आहेत तो एक स्फोट आहे जो अकस्मात यांना अशा स्थितीत गाठील जेव्हा हे (आपल्या ऐहिक व्यवहारांत) भांडत असतील,ا
Tafseer
36.48
وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا الْوَعْدُ إِنْ كُنْتُمْ صَادِقِينَ
हे लोक म्हणतात की, ही पुनरुत्थानाची धमकी पूरी तरी केव्हा होणार? सांगा, जर तुम्ही खरे असाल.ا
Tafseer
36.51
وَنُفِخَ فِي الصُّورِ فَإِذَا هُمْ مِنَ الْأَجْدَاثِ إِلَىٰ رَبِّهِمْ يَنْسِلُونَ
मग एक नरसिंघ फुंकले जाईल आणि अकस्मात हे आपल्या पालनकर्त्यांच्या पुढे हजर होण्याकरिता आपापल्या कबरीतून बाहेर पडतील.ا
Tafseer
36.50
فَلَا يَسْتَطِيعُونَ تَوْصِيَةً وَلَا إِلَىٰ أَهْلِهِمْ يَرْجِعُونَ
आणि त्यावेळी हे मृत्यूपत्रदेखील करू शकणार नाहीत, आपल्या घरीदेखील परतू शकणार नाहीत.ا
Tafseer
36.53
إِنْ كَانَتْ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً فَإِذَا هُمْ جَمِيعٌ لَدَيْنَا مُحْضَرُونَ
एकच प्रचंड मोठा आवाज होईल आणि सर्वच्या सर्व आमच्यासमोर हजर केले जातील.ا
Tafseer
36.52
قَالُوا يَا وَيْلَنَا مَنْ بَعَثَنَا مِنْ مَرْقَدِنَا ۜ ۗ هَٰذَا مَا وَعَدَ الرَّحْمَٰنُ وَصَدَقَ الْمُرْسَلُونَ
घाबरून म्हणतील, हे आम्हाला आमच्या शयनगृहातून कोणी उठविले? - ही तीच गोष्ट आहे जिचे परमदयाळू ईश्वराने वचन दिले होते आणि प्रेषितांचे प्रतिपादन सत्य होते.ا
Tafseer
36.55
إِنَّ أَصْحَابَ الْجَنَّةِ الْيَوْمَ فِي شُغُلٍ فَاكِهُونَ
आज स्वर्गातील लोक मौज करण्यात मग्न आहेत.ا
Tafseer
36.54
فَالْيَوْمَ لَا تُظْلَمُ نَفْسٌ شَيْئًا وَلَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ
आज कोणावर यत्किंचितही अन्याय केला जाणार नाही आणि तुम्हाला तसाच मोबदला दिला जाईल जशी तुम्ही कृत्ये करीत होता.ا
Tafseer
36.57
لَهُمْ فِيهَا فَاكِهَةٌ وَلَهُمْ مَا يَدَّعُونَ
आसनावर लोड लावून, हर तर्हेचे स्वादिष्ट पदार्थ खाण्यापिण्यासाठी त्यांच्याकरिता तेथे उपलब्ध आहेत, जे काही ते मागतील त्यांच्यासाठी हजर आहे.ا
Tafseer
36.56
هُمْ وَأَزْوَاجُهُمْ فِي ظِلَالٍ عَلَى الْأَرَائِكِ مُتَّكِئُونَ
त्यांची जोडपी गडद छायेत आहेत.ا
Tafseer
36.61
وَأَنِ اعْبُدُونِي ۚ هَٰذَا صِرَاطٌ مُسْتَقِيمٌ
आणि माझीच भक्ती करा, हा सरळमार्ग आहे?ا
Tafseer
36.60
أَلَمْ أَعْهَدْ إِلَيْكُمْ يَا بَنِي آدَمَ أَنْ لَا تَعْبُدُوا الشَّيْطَانَ ۖ إِنَّهُ لَكُمْ عَدُوٌّ مُبِينٌ
आदमच्या मुलांनो, मी तुम्हाला आदेश दिला नव्हता काय की शैतानाची भक्ती करू नका, तो तुमचा उघड शत्रू आहेا
Tafseer
36.63
هَٰذِهِ جَهَنَّمُ الَّتِي كُنْتُمْ تُوعَدُونَ
हा तोच नरक आहे ज्याची तुम्हाला भीती दाखविली जात होती,ا
Tafseer
36.62
وَلَقَدْ أَضَلَّ مِنْكُمْ جِبِلًّا كَثِيرًا ۖ أَفَلَمْ تَكُونُوا تَعْقِلُونَ
परंतु असे असूनदेखील त्याने तुमच्यापैकी एका मोठ्या गटाला मार्गभ्रष्ट केले. तुम्हाला सुबुद्धी नव्हती काय?ا
Tafseer
36.65
الْيَوْمَ نَخْتِمُ عَلَىٰ أَفْوَاهِهِمْ وَتُكَلِّمُنَا أَيْدِيهِمْ وَتَشْهَدُ أَرْجُلُهُمْ بِمَا كَانُوا يَكْسِبُونَ
आज आम्ही यांची तोंडे बंद करून टाकत आहोत, यांचे हात आम्हाला सांगतील आणि यांचे पाय ग्वाही देतील की हे जगात कोणती कमाई करीत होते.ا
Tafseer
36.64
اصْلَوْهَا الْيَوْمَ بِمَا كُنْتُمْ تَكْفُرُونَ
जो द्रोह तुम्ही करीत होता त्यापायी आता त्याचे इंधन बना.ا
Tafseer
36.67
وَلَوْ نَشَاءُ لَمَسَخْنَاهُمْ عَلَىٰ مَكَانَتِهِمْ فَمَا اسْتَطَاعُوا مُضِيًّا وَلَا يَرْجِعُونَ
आम्ही इच्छिले तर यांना यांच्या जागीच अशाप्रकारे विकृत करून टाकू की यांना पुढेही जाता येऊ नये आणि मागेही फिरता येऊ नये.ا
Tafseer
36.66
وَلَوْ نَشَاءُ لَطَمَسْنَا عَلَىٰ أَعْيُنِهِمْ فَاسْتَبَقُوا الصِّرَاطَ فَأَنَّىٰ يُبْصِرُونَ
आम्ही इच्छिले तर यांचे डोळे बंद करून टाकू, मग यांनी रस्त्याकडे धाव घेऊन पाहावे, कुठून यांना रस्ता उमगेल?ا
Tafseer
36.69
وَمَا عَلَّمْنَاهُ الشِّعْرَ وَمَا يَنْبَغِي لَهُ ۚ إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ وَقُرْآنٌ مُبِينٌ
आम्ही या (पैगंबर (स.)) ला काव्य शिकविले नाही आणि याला काव्यरचना शोभतही नाही. हा तर एक उपदेश आहे आणि स्पष्ट वाचला जाणारा ग्रंथ,ا
Tafseer
36.68
وَمَنْ نُعَمِّرْهُ نُنَكِّسْهُ فِي الْخَلْقِ ۖ أَفَلَا يَعْقِلُونَ
ज्या माणसाला आम्ही दीर्घायुष्य देतो त्याचा पाया आम्ही उखडून टाकतो, (ही दशा पाहून) यांना सुबुद्धी येत नाही काय?ا
Tafseer
36.71
أَوَلَمْ يَرَوْا أَنَّا خَلَقْنَا لَهُمْ مِمَّا عَمِلَتْ أَيْدِينَا أَنْعَامًا فَهُمْ لَهَا مَالِكُونَ
काय हे लोक पहात नाहीत की आम्ही आपल्या हाताने बनविलेल्या वस्तूंपैकी यांच्यासाठी प्राणीमात्र निर्माण केले आहेत आणि हे आता त्यांचे मालक आहेत?ا
Tafseer
36.70
لِيُنْذِرَ مَنْ كَانَ حَيًّا وَيَحِقَّ الْقَوْلُ عَلَى الْكَافِرِينَ
जेणेकरून त्याने त्या प्रत्येक माणसाला सावध करावे जो जिवंत असेल. आणि इन्कार करणार्यांवर प्रमाण सिद्ध होईल.ا
Tafseer
36.73
وَلَهُمْ فِيهَا مَنَافِعُ وَمَشَارِبُ ۖ أَفَلَا يَشْكُرُونَ
आणि त्याच्यात यांच्यासाठी नाना प्रकारचे लाभ आणि पेये आहेत. मग काय हे कृतज्ञ होत नाहीत?ا
Tafseer
36.72
وَذَلَّلْنَاهَا لَهُمْ فَمِنْهَا رَكُوبُهُمْ وَمِنْهَا يَأْكُلُونَ
आम्ही त्यांना अशाप्रकारे यांच्या अधीन केले आहे की त्यांच्यापैकी कुणावर हे स्वार होतात, तर कोणाचे मांस खातात,ا
Tafseer
36.75
لَا يَسْتَطِيعُونَ نَصْرَهُمْ وَهُمْ لَهُمْ جُنْدٌ مُحْضَرُونَ
ते यांना कोणतीच मदत करू शकत नाहीत किंबहुना हे लोक उलट त्यांच्यासाठी खडे लष्कर बनलेले आहेत.ا
Tafseer
36.74
وَاتَّخَذُوا مِنْ دُونِ اللَّهِ آلِهَةً لَعَلَّهُمْ يُنْصَرُونَ
हे सर्वकाही असूनसुद्धा यांनी अल्लाहशिवाय इतर उपास्य बनविले आहेत आणि हे आशा बाळगतात की यांना मदत दिली जाईल.ا
Tafseer
36.77
أَوَلَمْ يَرَ الْإِنْسَانُ أَنَّا خَلَقْنَاهُ مِنْ نُطْفَةٍ فَإِذَا هُوَ خَصِيمٌ مُبِينٌ
काय मनुष्य पाहात नाही की आम्ही त्याला वीर्यापासून निर्माण केले आणि मग तो भांडखोर बनून उभा ठाकला?ا
Tafseer
36.76
فَلَا يَحْزُنْكَ قَوْلُهُمْ ۘ إِنَّا نَعْلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعْلِنُونَ
बरे ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यांनी तुम्हाला दुःखी बनवू नये. यांच्या अंतर्बाह्य गोष्टींना आम्ही जाणतो.ا
Tafseer
36.79
قُلْ يُحْيِيهَا الَّذِي أَنْشَأَهَا أَوَّلَ مَرَّةٍ ۖ وَهُوَ بِكُلِّ خَلْقٍ عَلِيمٌ
त्याला सांगा, यांना तोच जिवंत करील ज्याने यांना पूर्वी निर्मिले होते आणि तो निर्मितीचे प्रत्येक कार्य जाणतो.ا
Tafseer
36.78
وَضَرَبَ لَنَا مَثَلًا وَنَسِيَ خَلْقَهُ ۖ قَالَ مَنْ يُحْيِي الْعِظَامَ وَهِيَ رَمِيمٌ
आता तो आम्हावर दृष्टांत लावीत आहे आणि आपल्या निर्मितीस विसरत आहे. सांगतो, कोण या हाडांना जिवंत करील जेव्हा ती जीर्ण झाली असतील?ا
Tafseer
36.81
أَوَلَيْسَ الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِقَادِرٍ عَلَىٰ أَنْ يَخْلُقَ مِثْلَهُمْ ۚ بَلَىٰ وَهُوَ الْخَلَّاقُ الْعَلِيمُ
काय तो, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले यावर प्रभुत्व राखत नाही की यासारख्यांना निर्माण करू शकेल? का नाही, ज्याअर्थी तो निर्मितीत निष्णात आहे.ا
Tafseer
36.80
الَّذِي جَعَلَ لَكُمْ مِنَ الشَّجَرِ الْأَخْضَرِ نَارًا فَإِذَا أَنْتُمْ مِنْهُ تُوقِدُونَ
तोच ज्याने तुम्हांकरिता हिरव्यागार झाडापासून अग्नी उत्पन्न केला आणि तुम्ही त्यापासून आपल्या चुली प्रज्वलित करता.ا
Tafseer
36.83
فَسُبۡحَٰنَ ٱلَّذِي بِيَدِهِۦ مَلَكُوتُ كُلِّ شَيۡءٖ وَإِلَيۡهِ تُرۡجَعُونَ
पवित्र आहे तो ज्याच्या हाती प्रत्येक वस्तूचे संपूर्ण अधिपत्य आहे, आणि त्याच्याकडेच तुम्ही रुजू केले जाणार आहात.ا
Tafseer
36.82
إِنَّمَا أَمْرُهُ إِذَا أَرَادَ شَيْئًا أَنْ يَقُولَ لَهُ كُنْ فَيَكُونُ
तो तर जेव्हा एखाद्या वस्तूचा संकल्प करतो तेव्हा त्याचे काम फक्त एवढेच की तिला आज्ञा द्यावी की अस्तित्व धारण कर, आणि ती अस्तित्वात येते.ا
Tafseer
सुरा यासीन सारांश:
सुरा यासीनला “कुराणचे हृदय” असे संबोधले जाते. “यासीन” हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे नाव देखील आहे असे अनेकदा म्हटले जाते. यात ८३ श्लोक आहेत आणि कुराणचा ३६वा अध्याय आहे आणि त्यात ८०७ शब्द आणि ३,०२८ अक्षरे आहेत. यात ५ रुकू (विभाग) आहेत. हा 22व्या जुझचा भाग आहे आणि 23व्या ज्युझमध्ये सुरू आहे. हे मक्केत प्रकट झाले होते, म्हणून याला मक्की सूरा म्हणतात आणि खालील मुख्य मुद्द्यांवर जोर देते:
1. पैगंबराची पुष्टी:
प्रेषित मुहम्मद (स.व.) यांनी आणलेल्या संदेशाचे सत्य सांगून सूराची सुरुवात होते. तो लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी अल्लाहने पाठवलेला संदेशवाहक आहे यावर जोर देण्यात आला आहे.
2. अल्लाहची चिन्हे:
सुरा सृष्टीद्वारे अल्लाहच्या अस्तित्वाची आणि शक्तीची चिन्हे हायलाइट करते. त्यात रात्र आणि दिवसाची फेरबदल, वनस्पतींची वाढ आणि विश्वातील चमत्कारांचा उल्लेख आहे, लोकांना अल्लाहच्या महानतेचा पुरावा म्हणून या चिन्हांवर चिंतन करण्यास प्रोत्साहित करते.
3. संदेश नाकारणे:
हे संदेश नाकारणाऱ्यांच्या हट्टीपणाला संबोधित करते. त्यांना स्पष्ट चिन्हे आणि चमत्कार दाखवले असूनही, पुष्कळ लोक सत्य नाकारतात, ज्यामुळे त्यांना अपरिहार्य शिक्षा होते.
4. मागील राष्ट्रांची उदाहरणे:
सूरात भूतकाळातील समुदायांच्या कथा सांगितल्या आहेत ज्यांनी त्यांच्या संदेष्ट्यांना नाकारले आणि परिणामी विनाशाला सामोरे जावे लागले. हे सत्य नाकारणाऱ्यांसाठी एक चेतावणी आहे.
5. पुनरुत्थान आणि परलोक:
सुरा यासीन पुनरुत्थान आणि मृत्यूनंतरच्या जीवनाची वास्तविकता यावर चर्चा करते. हे यावर जोर देते की न्यायाच्या दिवशी सर्व मानवांचे पुनरुत्थान केले जाईल, जिथे त्यांना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरले जाईल.
6. दैवी दया:
सुरा विश्वास ठेवणाऱ्यांना अल्लाहची दया आणि संदेश स्वीकारणाऱ्यांना बक्षीस देतो. हे नीतिमान आणि अविश्वासू लोकांच्या नशिबातील फरक अधोरेखित करते, विश्वासणारे नंदनवनात राहतील यावर जोर देते.
7. प्रतिबिंबित करण्यासाठी कॉल करा:
लोकांना त्यांचे जीवन, त्यांच्या सभोवतालची अल्लाहची चिन्हे आणि पुनरुत्थान आणि जबाबदारीचे अंतिम सत्य यावर चिंतन करण्यास उद्युक्त करून सूराचा शेवट होतो.